या उपक्रमाविषयी / About Us

दिनांक - २६ जुलै २०१० (गुरुपौर्णिमा)

॥श्रीराम समर्थ॥

सप्रेम नमस्कार,

आम्ही आत्तापर्यंत ५ वेबसाईट्स, ४ ब्लॉग्स एवढे इ-साहित्य प्रसिध्द केलेले आहे. त्यातील एकूण लेखन ५००० पानांहून अधिक झालेले आहे. त्यामधील काही साहित्य आम्ही येथे पुस्तिका, ग्रंथरुपाने उपलब्ध करून देत आहोत. हे पीडीएफ्‌ रुपात असल्याने डाऊनलोड करून घेऊन वाचणे वाचकांना सोईचे जाईल असे वाटते आहे. एकापेक्षा अनेक फाईल-अटाचमेंटस्‌ एका ग्रंथामध्ये असू शकतील. अक्षरयोगिनी, Mangal फॉंटमध्ये मजकूर व अनेक रंगीत चित्रे, आणि प्रसंगी नकाशे असल्याने व संदर्भग्रंथांची नावे असल्याने ती वाचकांना उपयुक्त ठरतील असा विश्वास वाटतो आहे.
आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद, प्रेमळ सूचना अपेक्षित आहेत.

आपले स्नेहाकांक्षी,

ऋजुता विनोद, प्रसाद शिरगांवकर व सर्व आदीवेंचर्सची टीम

॥ जय जय रघुवीर समर्थ॥